माझा सत्कार करा नाहीतर…; चंद्रकांत पाटीलांचे खडसेंना आव्हान
जळगाव लाईव्ह न्यूज । 29 फेब्रुवारी 2024 । मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील असं राजकीय वातावरण तापणार असल्याचं चित्र दिसत आहे. यामागील कारण म्हणजे एकनाथ खडसेंनी यांनी चंद्रकात पाटील यांना थेट आव्हान दिल होतं.
तुम्ही पूल बांधून दाखवा मी तुमचा जाहीर सत्कार करेन, असं वक्तव्य खडसेंनी केलं होत. खडसेंच्या याच विधानाची आठवण करून देत चंद्रकात पाटील यांनी त्यांना खोचक टोला लगावला. ‘माझा सत्कार करा नाहीतर मी तुमच्या घरी येतो सत्कार स्वीकारण्यासाठी’ असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना दिलं
मी निवडून आलो त्याच दिवशी या पुलाचा संकल्प माझ्या डोक्यात होता, मात्र तेव्हाच खडसे मध्येच कुदले. मतदार संघात खडसेंकडून तर काहीही विकास झाला नाही, अशी टीका पाटील यांनी केली. मीसुद्धा माझ्या वक्तव्यावर ठाम रहात, कोट्यवधी रुपये खर्च करून हा महत्वाकांक्षी पूल उभारत आहे. आता या पुलाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच होणार आहे.