⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रात्री थंडी, दिवसा उन्हाच्या झळा ; आठवड्याभरात तापमान इतके घसरले

रात्री थंडी, दिवसा उन्हाच्या झळा ; आठवड्याभरात तापमान इतके घसरले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 25 फेब्रुवारी 2024 । गेल्या रविवारी (दि.१८) भुसावळ शहराचे कमाल तापमान ३८.८ तर किमान तापमान २० अंशांवर पोहोचले होते, यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून कमाल व किमान तापमानात घट झाली. शनिवारी कमाल तापमान ३५ अंश तर किमान १४ अंश तापमानाची नोंद झाली, पश्चिमी विक्षोभामुळे हे परिणाम झाले.

भुसावळ शहराच्या तापमानावर पश्चिमी विक्षोभाचा परिणाम झाला आहे. यामुळे थंडीचा जोर वाढला आहे. २० अंशांवरील किमान तापमान सहाने कमी होऊन १४ अंशांपर्यंत खाली आले, तर शनिवारी कमाल तापमान ३५ अंश नोंदवले गेले. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत त्यात सरासरी ३८ अंशांची घट झाली. असे असले तरी उकाडा कायम आहे.

मात्र किमान तापमान कमी झाल्याने रात्री थंडी जाणवते. शिवाय कमाल आणि किमान तापमानात देखील तब्बल २१ अंशांच्या तफावतीमुळे विषम वातावरण निर्माण झाले आहे. या बदलामुळे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सदर्दी, खोकला, गळ्याच्या इन्फेक्शनचे हे रुग्ण आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.