जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२४ । राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झालेला पाहायला मिळतोय. फेब्रुवारीच्या तिसऱ्याच आठवड्यात तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली होती. गेल्या पाच दिवसापूर्वी जळगावातील तापमान कमाल ३८ अंशावर गेलं होते. यामुळे भरदुपारी उन्हाच्या झळा बसत होत्या. मात्र आता कमाल आणि किमान तापमानाचा पारा घसरला आहे.
काल गुरुवारी जळगावचे कमाल तापमान ३१.४ अंश तर किमान तापमान १४ अंशांवर होते. सध्या काश्मिरी भागातील काही ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. यातच ढगाळ वातावरण आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात बदल झाला. जळगावात गेल्या पाच दिवसात तापमानाचा पारा तब्बल ७ अंशापेक्षा जास्तने घसरला आहे.
१८ फेब्रुवारीला जळगावचे कमाल तापमान ३८ अंशावर गेले होते. हे यंदाच्या फेब्रुवारीतील सर्वाधिक तापमान होते. यामुळे दुपारी उन्हाची चांगलीच झळ बसत होती. मात्र आता तापमानात मोठी घट झाली. १८ फेब्रुवारीला जळगावचे कमाल तापमान ३८ अंशावर गेले होते. यामुळे दुपारी उन्हाची चांगलीच झळ बसत होती. मात्र रात्री आणि पहाटे थंडी जाणवली.
दरम्यान, गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमाल तापमान ३० अंशाखाली तर किमान तापमान १० अंशाखाली होते. यामुळे जळगावात थंडीचा गारठा जाणवला होता. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगावचे तापमान वाढताना दिसून आले. तापमानाचा पारा वाढत असल्याने थंडीचा गारठा हरवला. तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहे. परंतु रात्री आणि पहाटे थंडी जाणवली.