ग्राहकांना मोठा दिलासा ! दोन दिवसात चांदी 1000 रुपयांनी घसरली, सोनेही झाले स्वस्त..

फेब्रुवारी 23, 2024 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२४ । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोमवारपासून सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. एका दिवसाआड मौल्यवान धातूचे भाव कमी-अधिक होत आहे. आता किंमतीत घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसात चांदीची किमतीत तब्बल 1000 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे सोनेही घसरले आहे. पहा आजचे भाव.. Gold Silver Rate 23 February 2024

gold silver jpg webp

जळगाव सराफ बाजरात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 72000 रुपयांवर होता. तर सोन्याचा दर 62,400 रुपयांवर होता. मात्र सोने 100 रुपयाने तर चांदी 500 रुपयांची वाढ झाली. मंगळवार आणि बुधवारी चांदीच्या दरात प्रत्येकी 500 रुपयाची वाढ झाल्यामुळे बुधवारी सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 73000 रुपयावर गेला होता. मात्र बुधवारी सायंकाळच्या सत्रात चांदीत पुन्हा 500 रुपयाची घसरण दिसून आली. त्यानंतर गुरुवारी देखील चांदी 500 रुपयांनी घसरले.

गेल्या दोन सत्रात चांदी दरात 1000 रुपयाची घसरण झाली. आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 72000 रुपयांवर आला आहे. याच प्रमाणे गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात किंचित 100 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी दर 57,330 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी दर 62,600 रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now