⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे डॉ. वर्षा कुलकर्णी यांचा सत्कार

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे डॉ. वर्षा कुलकर्णी यांचा सत्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२४ । अ.भा. हदयास्त्रक्रिया भूलतज्ञ परिषद या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच नागपूरला व्दिवार्षिक निवडणूक झाली असता डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णलयाच्या नामवंत हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ डॉ. वर्षा कुलकर्णी यांची या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी वर सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी विक्रमी मतांनी निवड झाली.याबददल आज त्यांचा सत्कार करण्यात आला.

जळगावच्या डॉक्टरांची या संस्थेत निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.अ. भा. हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ परिषद या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची नागपूर येथे नुकतीच कार्यशाळा पार पाडली.तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत जळगावच्या नामवंत हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ उॉ. वर्षा कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. कुलकर्णी या गेल्या चोवीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून आज पर्यंत अकरा हजारावर शस्त्रक्रियात सहभाग घेतलेला आहे.

कार्यशाळेच्या अखेर या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणुक झाली ,यात डॉ. वर्षा कुलकर्णी या विक्रमी मतांनी सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी निवडून आल्या. या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर जळगावची व्यक्ती निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ असून या यशा बदृल गोदावरी फौंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या भाजपा महीला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच जळगाव इंडियन मेडिकल कौन्सिल व जळगाव भूलतज्ञ संस्थेने डॉ. कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय येथे वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी पुष्पगुच्छ देवून डॉ वर्षा कुळकर्णी यांचा सत्कार केला व अभिनंदन केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.