⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राष्ट्रीय | 300 किलोमीटरचा प्रवास, शेजारी प्रवाशांनाही कळलंच नाही; कामयानी एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

300 किलोमीटरचा प्रवास, शेजारी प्रवाशांनाही कळलंच नाही; कामयानी एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२३ । सध्या देशातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. याच दरम्यान, कामयानी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा थंडीमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ट्रेनमधील इतर प्रवाशांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती. कितीतरी वेळ कोणालाही त्याच्या मृत्यूबद्दल कळलेच नाही

मृत युवक बैतूलचा रहिवासी असल्याचे त्याच्या तिकिटावरून समजले. हा तरूण कामयानी एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमधील सिंगल विंडो सीटवर बसला, मात्र त्याच वेळी थंडीमुळे त्याचा बसल्या -बसल्या त्या जागी मृत्यू झाला, डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. थंडीमुळे ॲटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धक्कादायक म्हणजे त्याच बोगीत शेजारी असलेल्या इतर प्रवाशांना या गोष्टीचा जराही सुगावा लागला नाही. इतर लोकांना, प्रवाशांना वाटलं की तो बसल्या जागीच झोपी गेला आहे. कारण त्या तरूणाच्या कानात इअरफोन तर होते, पण त्याची काहीच हालचाल होत नव्हती. ते पाहून इतरांना संशय आला आणि त्यांनी तपासले असता, त्याच्या मृत्यू झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वे कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास दमोह स्टेशनवर ट्रेनमधून त्या तरूणाचा मृतदेह उतरवण्यात आला.

यानंतर जीआरपीने त्या तरूणाजवळ सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्याच्या कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली. शोकाकुल कुटुंबियांनी कसेबसे दमोह गाठून त्यांच्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेताल. कुंटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण हा एसी कंपनीत कामाला होता आणि त्याच कामाच्या संदर्भात तो छनेरा येथे गेला होता. परत येताना ट्रेनमध्ये असतानाच त्याचे फोनवरून घरच्यांशी बोलणं झालं पण ते अखेरचं ठरलं. मुलगा घरी येण्याची वाट बघणाऱ्या कुटुंबियांवर त्याच्या अक्समात मृत्यू दुःखाचा डोंगर कोसळला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.