जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२३ । लग्नसराईचा हंगामात सुरु होताच सोने-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या. ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीत चढउतार सुरु असून मागील काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. Gold Silver Price 12 December 2023
उच्चांकीपासून दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आज सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी, कोणत्या किंमतीला उपलब्ध आहे हे शोधणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे (Gold-Silver Rate Today)
या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली होती. तर काल सोमवारी, 11 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती जवळपास 300 रुपयांची घसरण दिसून आली. जळगाव सुवर्णनगरीत आता 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा. गेल्या आठवड्यातील घसरणीचा ट्रेंड अजून कायम आहे. 11 डिसेंबर रोजी भाव 300 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी 72000 रुपये आहे. दरम्यान, जळगावात विनाजीएसटी सोन्याने 64000 रुपयांपर्यतचा उच्चांकी दर गाठला होता. तर चांदीने 77800 पर्यतचा उच्चांकी दर गाठला होता. त्यानुसार उच्चांकापासून सोन्याचा दर जवळपास 2 हजार रुपयांनी घसरला तर चांदी तब्बल 5,800 रुपयापर्यंत घसरली