⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 5 दिवस काम ; राज्यसभेत सरकारची महत्वाची माहिती

बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 5 दिवस काम ; राज्यसभेत सरकारची महत्वाची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सरकारने म्हटले आहे की, आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त ५ दिवस काम असेल. म्हणजे दर शनिवारी सुट्टी मिळेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

आज मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरकारनेच सांगितले की, आता सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक दोन दिवस सुट्टी असेल. म्हणजे महिन्यातील सर्व शनिवार सुट्टीचे असतील. या प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा झाली. या प्रस्तावाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी आहे.

बँक कर्मचारी ही मागणी बऱ्याच दिवसांपासून करत होते. बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण लक्षात घेऊन सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची व्यवस्थापन संस्था इंडियन बँक असोसिएशनने सर्व शनिवार बँकांमध्ये सुटी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आधीच सरकारला सादर केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात खुद्द सरकारनेच ही माहिती दिली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.