⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्हा न्यायालयात 132 जागांवर भरती; 7वी पास ते ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी!

जळगाव जिल्हा न्यायालयात 132 जागांवर भरती; 7वी पास ते ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२३ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात मेगाभरती होणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. सातवी पास ते पदवी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. Jalgaon District Court Bharti 2023

या पदांसाठी होणार भरती
1) लघुलेखक – 06
2) कनिष्ठ लिपिक – 92
3) शिपाई/हमाल – 34

शैक्षणिक पात्रता:
लघुलेखक (निम्नश्रेणी): 
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
(वरील शैक्षणिक पात्रता 2018 च्या भरतीनुसार आहे. यात बदल असू शकतो)

वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).

पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023.

जाहिरात पहा : PDF

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.