जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२३ । उद्यापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत सोने आणि चांदी (Gold Silver Price) खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा घसरणीचा काळ सुरू झाला आहे. सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 60 हजाराखाली आला आहे. तर चांदीचा दर देखील घसरला आहे. Gold Silver Price Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सलग चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीत स्वस्ताई आल्याने ग्राहकांना हायसे वाटले आहे. त्यांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहे. धनत्रोयदशीपर्यंत घसरण कायम राहिल्यास सराफा पेठेत गर्दी उसळेल.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली होती. गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीत 3,651 रुपयांची वाढ झाली होती. ऑक्टोबरच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ऑक्टोबरला ते 57,719 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे 31 ऑक्टोबरला 61,370 रुपयांवर पोहोचले. मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत चढ उतार दिसून आला.
मागील गेल्या काही सत्रात सोन्यासह चांदीच्या किमतीत झाली. दिवाळीच्या तोंडावर दोन्ही धातूंच्या कितमीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज गुरुवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर 121 रुपयांनी घसरून 59,888 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर 708 रुपयांनी घसरून 70,342 रुपये प्रति किलोने व्यवहार करत आहे.
दिवाळीपर्यंत सोने चांदी महागण्याची शक्यता?
दरम्यान, देशांतर्गत बाजारपेठेत सणासुदीला मागणी वाढेल. यानंतर लग्नाचा हंगाम सुरू होईल. अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने किमतींवर परिणाम होईल. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने 62 हजारांवर तर चांदी 75 हजारांपर्यंत जाऊ शकते.
जळगाव सुवर्ण नगरीमधील दर
जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचा दर विनाजीएसटी 61200 रुपये प्रति तोळ्यापर्यंत आहे. तर चांदीचा दर 71,300 रुपये प्रति किलो इतका आहे.