मुलींच्या जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात मोठी वाढ ; वाचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

ऑक्टोबर 10, 2023 3:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुलींच्या जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

mantralay shinde jpg webp

वाचा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 7 धडाकेबाज निर्णय
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
(महिला आणि बालविकास)
सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
(जलसंपदा विभाग)
सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये
(विधि आणि न्याय विभाग)
पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
(महसूल विभाग)
फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
( परिवहन विभाग)
भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
( महसूल आणि वन विभाग)
विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
( उच्च आणि तंत्र शिक्षण)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now