धक्कादायक! सुसाईड नोट लिहून 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील घटना

ऑक्टोबर 4, 2023 12:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यात अल्पवयीन मुलं-मुली देखील टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. अशातच जळगाव शहरामधील गणेश कॉलनीत राहणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

tanmay succied jpg webp

अभ्यासाच्या ताणावातून सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. तन्मय गजेंद्र पाटील (वय-१४) असं या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तन्मय हा आई, वडील आणि मोठ्या भावासह गणेश कॉलनी परिसरात वास्तव्यास असून तो शहरातील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. त्यावेळी तन्मय याने घराच्या वरच्या मजल्यावर छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

वडील गजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता त्यांना जागेवर तन्मय दिसून आला नाही. म्हणून त्यांनी वरच्या खोली जावून पाहिले असता त्याने गळफास घेल्याचे असून आले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष सोनवणे करीत आहे. मयताच्या पश्चात आई,वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now