जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३ । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉ.उल्हास पाटील कृषी महाद्यिालय जळगाव येथील कृषीकन्या यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फैजपूर गावात कृषी कन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, सुप्रिया बडे यांनी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी केली..
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो. फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे फळांची होणारी नासाडी टाळता येते. या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. ए. देशमुख व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला