⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर! ‘सॅमसंग’चा 108MP कॅमेरावाला फोन 2,000 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या ऑफर

खुशखबर! ‘सॅमसंग’चा 108MP कॅमेरावाला फोन 2,000 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या ऑफर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । आगामी सणासुदीत अनेक जण काहीना काही वस्तू खरेदी करतात. अशा लोकांसाठी ईकॉमर्स कंपन्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नवनवीन ऑफर घेऊन येतात. जर तुम्ही सॅमसंगचे चाहते असाल आणि ऑफर शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

सॅमसंगच्या लोकप्रिय 6000mAh बॅटरी फोनवर ऑफर उपलब्ध करून दिली जात असून हा फोन 2000 रुपयांच्या स्वस्त किमतीत खरेदी करता येईल. Flipkart वर उपलब्ध असलेल्या डीलबद्दल बोलायचे तर, ग्राहक सॅमसंग गॅलेक्सी F54 5G अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकतात. Flipkart वर दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy F54 5G 2,000 रुपयांच्या स्वस्त किमतीत खरेदी करता येईल.

सॅमसंगचा हा फोन 35,999 रुपयांऐवजी 27,999 रुपयांना खरेदी करता येईल. खास गोष्ट म्हणजे तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय ग्राहक ते EMI अंतर्गत 3,111 रुपये प्रति महिना खरेदी करू शकतात.

जर आपण Samsung Galaxy F54 5G च्या फीचर्सबद्दल बोललो तर यात खूप खास बॅटरी आणि कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी+ (2400 x 1080 पिक्सेल) सुपर AMOLED प्लस डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येतो.

हा नवीन स्मार्टफोन Android 13 आधारित One UI 5.1 OS वर चालतो. यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह ऑक्टा-कोर 5nm Exynos 1380 प्रोसेसर आहे. कॅमेरा म्हणून, या सॅमसंग फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि मागील बाजूस 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

पॉवरसाठी, Samsung Galaxy F54 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आहे आणि ती 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 6, 5G, Bluetooth v5.3, GPS सपोर्ट आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.