⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | वाणिज्य | चांदी पुन्हा विक्रमी दराकडे ; ‘या’ आठवडाभरात 3300 रुपयांची वाढ, सोनेही वधारले..

चांदी पुन्हा विक्रमी दराकडे ; ‘या’ आठवडाभरात 3300 रुपयांची वाढ, सोनेही वधारले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२३ । सलग अनेक आठवडे घसरल्यानंतर या आठवड्यात सोने-चांदीच्या (Gold Silver) दरात वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात घसरण नोंदवली जात आहे. त्यामुळे सोन्याचा दर ५८ हजाराच्या घरात आला होता; तर चांदीची दरही घसरून ७० हजाराच्या आसपास आला होता. मात्र या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये वाढ झालेली दिसून येतेय. सोने किंचित महागले आहे. मात्र चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. Gold Silver Rate Today

शनिवारी संपलेल्या आठवड्यात चांदीच्या दरात प्रती किलोमागे तब्बल सव्वातीन हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर ७४,३०० रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातील ही तेजी दोन महिन्यापूर्वीच्या विक्रमी दराकडे वाटचाल दर्शवित आहे.

सोने-चांदी दरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह घडामोडीचा परिणाम होत असतो. चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चांदीचे दर हे ७०००० हजारांच्या दरम्यान होते. मात्र, त्यानंतर त्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी ७१,००० रुपये प्रती किलोवर पोहोचलेली चांदी शेवटच्या दिवशी शनिवारी ३३०० रुपयांच्या वाढीसह ७४,३०० रुपयांवर पोहोचली. चांदी यंदाच्या जुलै महिन्यात १९ तारखेला विक्रमी ७६, २०० रुपये किलो दर नोंदवले.

दुसरीकडे मात्र सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोने ५९ हजार रुपयांच्या खाली येऊन ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले होते. मात्र २२ रोजी त्यात २०० रुपयांची वाढ झाली. तसेच २४ ऑगस्ट रोजी पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन ते ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तीन दिवसांपासून सोने याच भावावर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने चांदीच्या भावात वाढ झाली असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.