नारायण आंबटकर (बारी) यांचे निधन

मे 20, 2021 1:26 PM
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ ।  शिरसोली प्र.न.येथील शेतकरी नारायण विठ्ठल आंबटकर (बारी, वय 46) यांचे अल्पशा आजाराने दि.19 मे बुधवार रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुल़गा, तीन भाऊ, दोन बहिणी व आई असा मोठा परिवार आहे. त्यांना कृषी क्षेत्रात विशेष रस होता. कृषी क्षेत्रात ते विविध प्रयोग करीत होते.
ते मितभाषी व सर्वांना सहकार्य करण्याची त्यांची सतत तळमळ होती.गेल्या 3 मे रोजी त्यांच्या सुविद्य पत्नी भारती आंबटकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. जळगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी यांचे ते नातेवाईक होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now