जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून 17 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मिझोराममध्ये घडली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही मजूर गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्यांच्या हवाल्याने सांगितले की, मिझोरामची राजधानी आयझॉलपासून 21 किमी अंतरावर असलेल्या सैरांगमध्ये सकाळी 10 वाजता हा अपघात झाला. रेल्वे पुलाचे काम सुरु असताना हा पूल कोसळला. या अपघातात 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. ढिगाऱ्याखाली अजूनही काही मजूर गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजे 341 फूट आहे. हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा 42 उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल.
बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशासन मदत कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसचे जखमींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.