पिक पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते जुन्या किमतीमध्ये खरेदी करण्याचे आव्हान

मे 19, 2021 10:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । यावल तालुक्यात कोणत्याही क्रुषि केंद्रावर रासायनिक खते खरेदी करताना जुन्या किंमती प्रमाणे खंताची खरेदी करा अश्या सुचना क्रुषि अधिकारी डी पी कोते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वरे केले आहे.

jalgoan news

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाच्या सर्वसामान्य माणूस व शेतकरी यांना हे देखील दुहेरी संकटात सापडले असून अश्या परिस्थितीत यंदाच्या खरीप हंगामात मशागतीच्या कामास वेग आला असून यंदा पिकांना लागणारे रासायनिक खतांचे किंमती मोठ्या प्रमाणावर वाढविणे आले आहे की यामुळे शेतकरी राजा अर्थिक अडचनित सापडला आहे यावल पंचायत समितीचे अधिकारी डी पी कोते तथा तालुका क्रुषि अधिकारी रमेश जाधव यांनी शेतक-यानी तालुक्यातील कोणत्याही क्रुषि केंद्रावर रासायनिक खते खरेदी करताना तपासणी करून जुन्या किमतीप्रमाणे रासायनिक खते खरेदी करा दरम्यान जुन्या साठवनीत असलेल्या या किमती पेक्षा  अधिक भावाने कुणी रासायनिक खते विक्री करीत असल्याचे व शेतकरी राज्यांना आर्थिक फसवणूक करीत असले तर त्याची तक्रार सरळ शेतक-यानी पंचायत समितीचे क्रुषि अधिकारी डी पी कोते यांच्याकडे तात्काळ दुरध्वनी क्रमांकावर ९८३४९८२४४२ या ठिकाणी सपंर्क साधावा तथा रासायनिक खते खरेदी करताना बिल पावती घेवून तक्रार अर्ज द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now