⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | गुन्हे | जळगाव एसपींचा दणका ; गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर एमपीडीएची कारवाई

जळगाव एसपींचा दणका ; गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर एमपीडीएची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या दाखल गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार विशाल भिका कोळी (वय-२४) याला एमपीडीए कायद्यांर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. .

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार विशाल कोळी यांच्या विरोधात वेगवेगळे एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल असून यापूर्वी त्याला दोन वेळा हद्दपार करण्यात आले आहे. तरी देखील त्याने हद्दपारचे आदेश उल्लंघन केल्यामुळे रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुन्हेगार विशाल कोळी याच्याविरोधात अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला.

त्यानुसार एम राजकुमार यांनी तो अहवालाचे अवलोकन करून अट्टल गुन्हेगार विशाल भिका कोळी याला एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे. आदेशानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, पोहेकॉ विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलाल सिंग परदेशी, किरण पाटील यांनी संशयित आरोपीला स्थानबद्ध केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.