गुन्हेजळगाव जिल्हा
धक्कादायक ! जळगावच्या तरुणीवर मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन अत्याचार
जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। सध्या दिवसेंदिवस फसवेगिरी आणि अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच जळगाव तालुक्यातील कठोरा येथील २१ वर्षीय तरुणीला जुन महिन्यात मध्यप्रदेशात नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाबात तालुका पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर सपकाळे (कठोरा) याने तरुणीला ३ ते १० जून दरम्यान मध्य प्रदेशातील इंदूर व प्रितमपुर येथील वेगवेगळ्या लॉज वर घेऊन गेला. तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले, अशी तक्रार २० जुलै रोजी पिडीतीने केली आहे. तालुका पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.