⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | सामाजिक | ‘भारत माता की जय’ चांद्रयान-3 अवकाशात झेपावले !

‘भारत माता की जय’ चांद्रयान-3 अवकाशात झेपावले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । भारताचे ‘चांद्रयान-3’हे महत्त्वाकांक्षी यान आज यशस्वीरीत्या झेपावले. यामुळे भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला.यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परीसर दणाणला होता.(chandrayan 3 jalgaon live news)

श्रीहरीकोटा भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मोहीम फत्ते केली. देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला मोहिमेसाठी भारताने तब्बल 615 कोटी रुपयांचा खर्च केला. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.

3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे. (chadrayan 3 in space)

चांद्रयान-3 चे वातावरणापासून संरक्षण करणारी हीट शील्ड सुमारे 92 किमी उंचीवर रॉकेटपासून वेगळी होईल. 115 किमी अंतरावर चांद्रयानाचं इंजिन देखील वेगळं होईल आणि क्रायोजेनिक इंजिन कार्य करण्यास सुरुवात करेल. याचा वेग 16 हजार किमी प्रति तास असेल.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह