50 लाख रूपये द्या अन्यथा.. धनंजय मुंडेंना धमकीचा फोन

जुलै 11, 2023 3:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यापाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

dhananjay Munde jpg webp

धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता. मला 50 लाख रूपये द्या अन्यथा… मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now