जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

जे माझे झाले नाहीत ते तुमचे काय होतील ; एकनाथराव खडसे यांचा अजित पवारांच्या गटाला टोला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । मी भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी 40 वर्ष मेहनत घेतली. 40 वर्ष भारतीय जनता पक्ष वाढवला मात्र तो पक्ष आणि ते लोक माझे झाले नाहीत. ते तुम्ही आता गेलेल्या नवीन लोकांचे काय होतील ? असा सवाल एकनाथराव खडसे यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला विचारला

माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात मी कधीही इतका घाणेरड राजकारण बघितलेलं नाही. एकनाथराव खडसे म्हणाले. शरद पवारांसोबत आज जनता आहे सहा महिन्यात निवडणुका लागणार आहेत. जे तिकडे गेलेत आपण त्या सगळ्यांना पाडू असेही एकनाथराव खडसे म्हणाले.

याचबरोबर जे गेले ते ईडीच्या धाकामुळे गेले आहेत असे म्हटले जात आहे. मात्र इडी मलाही लागली होती. ते केवळ ईडीच्या धाका पोटी नसून ते सत्तेच्या लालसापोटी गेले आहेत. असे यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले.

वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज बोलावली होती. या बैठकीवेळी विविध नेत्यांनी आपले भाषण केले. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे अश्या दिग्गज नेत्यांसोबत एकनाथराव खडसे यांनी देखील भाषण केले.

Related Articles

Back to top button