Gold Silver Today : जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव..

जुलै 3, 2023 10:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२३ । जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. कारण सोमवारी सोन्या-चांदीच्या(Gold Silver Price Today) दरात स्थिरता दिसून आली आहे. जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 53,770 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 58,700 रुपये आहे. दुसरीकडे सध्या चांदीचा दर 70,300 रुपयावर आहे.

gold silver 2 jpg webp

गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे दरात मोठी तफावत दिसून आली नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. यापूर्वी दोन महिण्यापुर्वी म्हणजेच 5 मे रोजी सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी 62 हजाराचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने देखील विनाजीएसटी 77 हजार रुपयाचा टप्पा ओलांडला होता. मात्र मे च्या पंधरवडापासून दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण होताना दिसून आलीय.

जून महिन्यात सोन्याच्या आघाडीवर दिलासा मिळाला. 1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये होता. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 59,820 रुपयांवर पोहचले होते. 29 जून रोजी पुन्हा घसरण झाली. हा भाव 58,900 रुपयांवर आला होता. 30 जून रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 58,500 रुपयांवर पोहचले. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी वाढ होऊन सोन्याचा दर 58700 रुपयांवर गेला.

दरम्यान, उच्चांकापासून सोने अद्यापही 3200 ते 3400 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर चांदीचा तब्बल 7500 ते 8000 हजार रुपयाने घसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now