सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विक्रमी पातळीवरून पहा कितीने घसरले..

जून 27, 2023 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या जागतिक बाजारात चढ उतार असल्याने भारतीय बाजारात देखील चढता उतरता आलेख आहे. मे महिन्याच्या पंधरवडापासून सोने आणि चांदीच्या किमतीत सतत पडझड सुरु आहे. परंतु विक्रमी पातळीवरून सोने -चांदी चांगलीच घसरली आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. चला जाणून घेऊयात आजचा भाव..

gold 1 jpg webp

सोन्याचा दर?
दरम्यान, जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचा दर 59 हजाराखाली आला आहे. सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 54000 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58,950 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत तब्बल 1000 रुपयांहून अधिकची घसरण झालेली दिसून आली. 19 जून रोजी सोन्याचा दर 59800 रुपयावर होता.

चांदीचा दर?
दुसरीकडे सध्या चांदीचा एक किलोचा विनाजीएसटी 70000 रुपये इतका आहे. मागील तीन दिवसापूर्वी चांदीचा दर 69000 हजारांवर होता. त्यात एक हजार रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. मात्र गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत जवळपास 4000 हजार रुपयाची घसरण झालेली दिसून आलीय. 19 जून रोजी चांदीचा दर 73500 रुपये इतका होता.

उच्चांक पातळीवरून सोने चांदी कितीने घसरली?
गेल्या मे महिन्यातील 5 तारखेला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 62 हजार रुपयावर गेला होता. तर चांदीचा एक किलोचा दर 77 हजार रुपयावर गेला होता. यामुळे ऐन लग्नसराईमध्ये सोने चांदी खरेदी करताना लोकांना घाम फुटत होता.मात्र त्यानंतर घसरण दिसून आलीय. उच्चांकापासून सोने जवळपास 3000 ते 3500 हजाराहून अधिकने घसरले आहे. तर चांदीचा दर तब्बल 8000 हजार रुपयांहून अधिकने घसरला असल्याचं पाहायला मिळते आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now