विक्रमी पातळीवरून सोने 3100, चांदी 8000 रुपयांहून अधिकने घसरली, आजचा नवीन दर काय?..

जून 25, 2023 10:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या जागतिक बाजारात चढ उतार असल्याने भारतीय बाजारात देखील चढता उतरता आलेख आहे. गेल्या दीड दोन महिण्यापुर्वी सोन्याचे दर तब्बल विनाजीएसटी 62 हजार रुपये प्रतितोळा इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या अवाक्याबाहेर ते गेले होते. मात्र विक्रमीपातळीवरून सोन्याचा दर भराच खाली आला आहे. Gold Silver Rate Today

gold silver 1 jpg webp

जळगावातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून सोने खरेदी करत असाल तर चांगली संधी चालून आली आहे. मागील गेल्या पाच दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झालीय. सध्या जळगाव सुवर्णनगरीत 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58900 रुपये प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी शनिवारी सकाळी सोन्याचा दर 58,800 रुपये इतका होता. त्यात 100 रुपयाची वाढ झालीय. मात्र मागील गेल्या पाच तब्बल 1000 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातील सोन्याचा दर 59800 रुपये इतका होता.

दुसरीकडे चांदी दरात देखील मोठी घसरण झाली आहे. सध्या चांदीचा एक किलोचा विनाजीएसटी 69,400 रुपये इतका आहे. हाच दर शनिवारी सकाळी 69000 रुपयावर होता. त्यात 400 रुपयाची वाढ झाली आहे. मात्र मागच्या गेल्या पाच दिवसात चांदीच्या किमतीत देखील तब्बल 4100 ते 4200 रुपयांची घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातील चांदीचा दर 73500 रुपये इतका होता.

दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदी दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले होते. लग्नसराई आणि इतर काही कारणांमुळे सोने चांदी खरेदी करताना लोकांना घाम फुटत होता. तर मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीने 62 हजाराचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीचे दर 77000 हजारच्या वर होते. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यात सोने जवळपास 3000 रुपयांहून अधिकने घसरले आहे. तर चांदीचा दर तब्बल 8000 हजार रुपयांहून अधिकने घसरला असल्याचं पाहायला मिळते आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now