आनंदाची बातमी : सहा महिन्यात शंभर कोटींची काम होणार पूर्ण !

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जून २०२३ | जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी नुकताच जळगाव शहराचे रस्ते व्हावेत यासाठी 100 कोटीचा निधी आणला. या शंभर कोटींच्या निधी मधून जळगाव शहरातले विविध रस्ते हे काँक्रीटचे होणार आहेत आणि जळगावकरांचा खड्ड्यांमधून प्रवास करण्याच्या मनस्ताप दूर होणार आहे. यातच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

raju mama bhole jpg webp

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, जळगाव शहरात सध्या विविध रस्त्यांचे काम सुरू आहेत. 38 कोटीच्या कामांपैकी 80 टक्के काम ही पूर्ण झाली आहेत. 20 टक्के काम पाऊस येण्याच्या आधी पूर्ण केली जातील. तर शंभर कोटीच्या निधी संदर्भात त्यांनी असे वक्तव्य केले की, शंभर कोटींच्या निधीतील सर्व काम ही येत्या सहा महिन्यात पूर्ण होणार आहेत. पीडब्ल्यूडी विभाग व महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यात आला असून येत्या सहा महिन्यात ही रस्त्यांची काम पूर्ण होणार आहेत.

महानगरपालिका प्रशासन आणि बांधकाम विभाग या दोघांमध्ये समन्वय नसल्याचेया तक्रारी गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षाने पुढे येत होत्या. याबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याशी पत्रकार परिषदेत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या दोघांमध्येही समन्वय आहे. यामुळेच जळगाव शहरातील शंभर कोटींच्या निधीतील सर्व रस्ते हे येत्या सहा महिन्यात पूर्ण होणार आहेत.

शंभर कोटीच्या निधी विषयीची काम ही जलद गतीने होणार असून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले की, एका दिवसाला एक रस्ता करायचा आमचा मानस आहे. याविषयीची यंत्रणा आम्ही उपलब्ध करणार असून लवकरात लवकर रस्ते होतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now