आजचा सोने चांदीचा भाव : १६ मे २०२१

मे 16, 2021 8:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ ।अक्षय तृतीयाचा सण होताच सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज रविवारी जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आज सोने प्रति ग्रॅम २६ रुपयाने वाढले आहे. तर चांदीच्या भावात मागील गेल्या दोन तीन दिवसापासून घट होत आहे. आज चांदीच्या भावात प्रति किलो ५०० रुपयांनी घट झालेली आहे.

gold

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८३३ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,३३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६०३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,०३० रुपये मोजावे लागतील.

 चांदीचा भाव

चांदीच्या भावात आज पुन्हा घट झाली आहे. आज चांदीच्या दरात ५०० रुपयांची घट झाली असून १ ग्राम चांदीचा भाव आज ७१ रुपये इतका असून १ किलोचा दर ७०,५०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now