⁠ 
शनिवार, मे 11, 2024

जिल्ह्यात वादळी वार्‍यांसह जोरदार पावसामुळे शेतीची मोठी हानी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ ।  जिल्ह्यातीत काल सायंकाळी काही ठिकाणी वादळी वार्‍यांसह जोरदार पाउस झाला. या पावसाने यावल तलुक्याला झोडपले असून यात शेतीची मोठी हानी झाली आहे.

यावल तालुक्यासह शहर व परिसरात पुनश्च मानसुनपुर्वी आलेल्या बुधवारी सायंकाळी चार वाजेपासून सुमारे दोन तास मोठया वेगाचा वादळी पाऊस झाला. या वादळाने रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली असुन, केळी पिके संपुर्ण भुईसपाट झाले असल्याची माहीती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर यावल शहरासह ग्रामीण भागात विद्युत पुरवठा मागील सात तासांपासुन खंडित झाला आहे.

या वादळाने किती नुकसान झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तर फैजपूर, रावेर ,चोपडा, धुळे ,दहिगाव, -सावखेडा सिम रस्त्यावर झाडे उन्मळून पडले आहेत. झालेल्या या वादळी वार्‍यासह आलेल्या मानसुन पुर्वीच्या पावसामुळे शेतीची देखील मोठी हानी झाली आहे.