पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान : केळी कोसळली
जळगाव लाईव्ह न्यूज| ४ जून २०२३ | जळगाव जिल्ह्यात रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. यावेळी प्रत्येक रस्त्यावर झाड पडलेली दिसून आली. झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.
यावल तालुक्यात व परिसरात रविवारी दुपारी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास अचानक मान्सून पुर्वीच्या आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या मुसळधार पावसासह आलेल्या वादळीवाऱ्याने यावल-चोपडा मार्गावर तसेच किनगाव डांभुर्णी, यावल, फैजपुर या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळल्याने सुमारे २ तास या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती.
जिल्ह्यातील फैजपुर व न्हावी , आमोदा, डोंगर कठोरा , वाघझीरा , नायगाव गावांसह तालुक्यातील ईतर ठीकाणी देखील गारपिटचा तडाका बसला असुन , या क्षेत्रात मोठया प्रमाणावर केळी पिकांचे सुमारे एक हजार हेक्टरवरी क्षेत्र बाधीत असुन यात शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे.