भीषण अपघातात १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू !

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । लग्न समारंभाहून परत येताना कार आणि टिप्परच्या झालेल्या भीषण अपघात १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी तिघे जण जखमी देतील झाली आहे. धारूर तेलगाव रस्त्यावर हि घटना घडली.

धारुर तालुक्यातील चिंचपूर येथील हंडिबाग कुटूंबीय माजलगाव येथे एका लग्न समारंभाला सहकुटूंब गेले होते. दुपारी लग्न उरकुन परतत असताना तेलगाव कारखान्याजवळ भोपा फाट्यावर एका टिप्परने टिप्पर (क्र. एमएच ४४ यु ९३०९ ) ने त्यांच्या स्कार्पियो कारला जोराची धडक दिली.

CRIM jpg webp

या धडकेत स्कार्पियो मधील दोन महिला जखमी झाल्या असून या अपघातात सोनू अशोक हंडिबाग या १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर अशोक हंडिबाग, मीरा इंडिबाग व निखील अशोक हंडिबाग हे तिघे गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे हंडिबाग कुटूंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now