जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२३ । HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. बँकेने MCLR दर 0.05 टक्क्यांवरून 0.15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर आज म्हणजेच 8 मे 2023 पासून लागू झाले आहेत.
घर आणि कार कर्जावर परिणाम होईल
MCLR दर वाढल्याने थेट गृहकर्ज आणि कार कर्जाच्या EMI वर परिणाम होईल. यामुळे, भविष्यात तुम्ही कर्ज घेतल्यास, तुम्हाला हप्त्याच्या स्वरूपात (EMI) जास्त पैसे द्यावे लागतील. HDFC बँकेच्या मते, एका रात्रीसाठी MCLR दर 7.95% वर गेला आहे. त्याच वेळी, हा दर एका महिन्यासाठी 8.10% आणि तीन महिन्यांसाठी 8.40% असेल. सहा महिन्यांसाठी MCLR दर 8.80 टक्के आहे.
बापरे..! जळगावात तरुणीकडून तरुणावर चाकू हल्ला, VIDEO व्हायरल
MCLR किती वाढला आहे?
त्याचप्रमाणे, ते एका वर्षासाठी 9.05% आणि दोन वर्षांसाठी 9.10% आहे. MCLR दर तीन वर्षांसाठी 9.20% पर्यंत वाढला आहे. MCLR वाढवण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होईल. जर तुम्ही आधीच गृहकर्जाचे हप्ते भरत असाल तर यामुळे तुमचा ईएमआय वाढेल आणि तुम्ही कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.
बँकेने केलेली ही वाढ फ्लोटिंग व्याजदरावर लागू आहे. त्याचा निश्चित व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. MCLR हा किमान व्याजदर आहे, ज्याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देत नाही.