राजकीय खळबळ : खासदार संजय राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.

sanjay raut 1 jpg webp

आज नितेश राणे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टिका केली.यावेळी ते उद्धव ठाकरे यांचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिला नाही. उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. मला उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश द्या, असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे, असे प्रतिपादन नितेश राणे यांनी याप्रसंगी केले.

शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला. तेव्हा राऊत यांना पवारांच्या व्यासपीठावर बसायचं होतं. त्यामुळे राऊत सकाळपासून पवारांच्या संपर्कात होते. पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे राऊत दुपारी ४ वाजता राऊत सिल्व्हर ओकला गेले असा सावा राणे यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now