जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२३ । अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे गेल्या महिन्यातसोन्याचं किमतीने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. ऐन लग्नसराईत दागिन्यांचे दर वाढल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. दरम्यान, सततच्या चढ-उतारा नंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. Gold Silver Rate Today
जळगावातील आजचा सोन्याचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी मागील सत्रात सोन्याचा भाव 60,600 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका इतका होता. म्हणजेच सोन्याच्या किमतीत 300 रुपयाची घसरण झाली आहे. उच्चांक दरापासून आतापर्यंत सोने जवळपास 1000 रुपयांहून अधिकने घसरले आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 63000 ते 65000 हजारापर्यंत जाणार असायचा अदांज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जळगावातील सोने-चांदीचे अपडेट्स भाव
रोज जाणून घेण्याकरिता क्लिक करा
जळगावातील आजचा चांदीचा दर?
मागील काही दिवसापासून चांदीच्या किमतीत मोठी चढ-उतार दिसून आली. सध्या जळगावमध्ये एक किलो चांदीचा दर 75000 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. दरम्यान, 14 एप्रिल रोजी जळगावमध्ये चांदीच्या किमतीने 77,500 रुपयाचा (विनाजीएसटी) उच्चांकी दर गाठला होता. तेव्हापासून आतापर्यंत चांदीच्या किमतीत 2500 हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. मात्र दिवाळीपर्यंत चांदी 80000 हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर 59,766 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर चांदीचा दर 74,035 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
हॉलमार्कचा संबंध
24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.