ठाकरे सरकारने अडीच वर्षात दमडी सुद्धा फेकून मारलेली नव्हती – गिरीश महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारने अडीच वर्षात दमडी सुद्धा फेकून मारलेली नव्हती, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
“गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाला आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अवकाळी नुकसानग्रस्तांना भरीव निधी राज्य सरकार देईल. सरकार शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या पाठीमागे खंबीर उभी आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले
यावेळी गिरीश महाजन म्हणाले कि, कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. यात विजय आमचाच होईल, असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरही गिरीश महाजन यांनी भाष्य केलंय. मार्केट कमिटीच्या निवडणुका झाल्या एकही दिवस मी मतदारसंघात नव्हतो. मात्र जामनेर तालुका हा माझा असा आहे मी मतदार संघात असो किंवा नसो जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. त्यामुळेच 18 जागेवर आमचा विजय झाला, असं गिरीश महाजन म्हणालेत.