जळगाव जिल्हाजळगाव शहर

जळगाव शहर महापालिकेनेच मोडले नियम : नगरसेविका ॲड शुचिता हाडा यांचा आरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ । इमारतीच्या आवारात गुदाम किंवा काही बांधायचे असल्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी नागरिकांना घ्यावी लागते मात्र सतरा मजली इमारतीमागील बाजूस गुदाम उभारण्यासाठी नगररचना व बांधकाम विभागाची कोणीही परवानगी न घेता काम सुरू केले आहे, असा आरोप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केला आहे.

अधिक माहिती अशी कि , महापालिकेच्या सतरा मजली इमारतीमागील बाजूस लोखंडी ॲंगल लाऊन वर पत्रे टाकून गुदाम उभारण्यात येत आहे. याबाबत भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी सांगितले, की सतरा मजली इमारतीच्या विद्रुपीकरणाचा हा प्रयत्नर आहेच. मात्र, ही गंभीर बाब आहे. सतरा मजली परिसरात दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास वाहन कसे जाणार, याचाही विचार करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या इमारतीच्या परिसरात बांधकाम करावयाचे असल्यास महापालिकेच्या नगररचना व बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते.

मात्र, महापालिकेला याची आवश्‍यकता वाटत नाही का? महापालिकाच नियमांचा भंग करीत असेल, तर सर्वसामान्यांना नियमांचा बाऊ का केला जातो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेकडे अनेक जागा असताना, तसेच सुरक्षेसाठी मक्ता दिलेला असतानाही महापालिकेच्या आवारातच जप्त करून आणलेल्या टपऱ्याचे गुदाम उभारण्यात का येत आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Back to top button