Gold-Silver Today : सोने-चांदी पुन्हा सुसाट ; आज ‘इतक्या’ रुपयांनी महागले

मार्च 29, 2023 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२३ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे ऐन लग्नसराईत सोन्याच्या (Gold Rate) किमतीत मोठी उसळी घेतली आहे. सोबतच चांदीने देखील उच्चांक पातळीवर पोहोचली आहे. सध्या सोने चांदीच्या (Silver Rate) किमतीत चढ-उतारचा काळ सुरु आहे. काल सकाळी जाहीर झालेल्या किमतीपेक्षा आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येतेय. चांदीची महागलेली दिसतेय. त्यामुळे सोने पुन्हा उच्चांक पातळीकडे जात आहे. Gold Silver Price Today

gold jpg webp

आजचा सोन्याचा दर
आज बुधवारी सकाळी जळगाव सुर्वण नगरीत सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,४०० रुपये इतका आहे. यापूर्वी काल मंगळवारी सकाळी सोन्याचा दर ५९,२०० रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच त्यात पुन्हा २०० रुपयाची वाढ झालेली आहे. दोन दिवसापूर्वी म्हणजेच सोमवारी सकाळी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५९,४०० तर काल मंगळवारी ५९,२०० रुपये असा होता. मात्र यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर ६५,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमतही ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

आजचा चांदीचा दर
चांदीच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास आज चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सकाळी चांदीचा दर ५०० रुपयांनी वाढून तो ७०,५०० रुपये प्रति किलोवर गेला आहे. दरम्यान, १० मार्चला ६४ हजार रुपयाच्या घरात असलेल्या चांदीने ७० हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच आतापर्यंत चांदीच्या किमतीत तब्बल ६ हजार रुपयांहून अधिकची वाढ झालेली आहे. यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव ७४,००० रुपयावर गेला होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे.
(वरील सोने आणि चांदीचे दर GST सह इतर कर वगळून आहेत)

ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now