जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | इतर वेळी शहरातील खाड्यांपासून आणि धुळीपासून स्वतःचा बचाव करणाऱ्या जळगावकरांना आता बिबट्यापासून सुद्धा स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. कारण जळगावच्या अगदी जवळच असणाऱ्या एका गावात बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अधिक माहिती अशी कि, जळगाव शहरा जवळ असलेल्या शिरसवली गावठाण शिवारातील शेतात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे.बिबट्याच्या भितीमुळे रात्री शेतात पाणी सोडण्यासही शेतकरी घाबरत आहेत. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तर झाले असे कि, . शिरसोली गावात राहणारे एक शेतकरी आपल्या मुलासह शनिवारी (ता. १८) रात्री नऊनंतर त्यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना रस्त्याने एक बिबट्या जाताना दिसून आला. आठवड्यापूर्वीच तालुक्यातील बेळी येथे एका बिबट्याने दोन शेळ्यांचा पडशा पडला होता. यामुळे आता शेतकरी व ग्रामस्थ चांगलेच चिंतीत आहेत.
जळगाव नजीक असलेल्या शिरसोली गावातल्या शेतात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. या ठिकाणी भाजी व फुलांची शेती होत असते. अश्यावेळी रात्री पाणी द्यायला जावे लागते. याचबरोबर रात्रपाळी संपवून चाकरमाने घराकडे परतत असताना, रस्त्यांवर आंधार असतो. अशीही भीती गावकऱ्यांना आहे.