⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना १००% कर्जमाफी द्या – एकनाथराव खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज : २० मार्च २०२२ :  अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला आता नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याची मागणी विधान परिषदेमध्ये आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.

शेतकऱ्यांना आधीच भाव मिळत नाही. कापूस आणि कांदा घरात पडून आहे. त्यातच वाढलेल्या खताचे भाव आणि मजुरांचे भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आणि आता झालेल्या अवकाळीमुळे तर शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा दुहेरी संकटामुळे अडकल्या शेतकऱ्याला शंभर टक्के कर्जमाफी मिळायलाच हवी असे यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले.

शेतकऱ्यांचं हजारो कोटींचे कर्ज माफ करा. निरव मोदी सारखे लोकं पैसै बुडवून गेले मग तुम्ही इथ असलेल्या शेतकऱ्यांवर अनन्या करु नका, असेही खडसे म्हणाले.शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अजुनही पंचनामे नाहीत. मंत्री लक्ष देत नाहीत. आता तलाठी कामावर नाहीत. मग पंचनामे कोण करणार? असा सवाल एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत उपस्थित केला.