जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजना (DPDC) मधून चाळीसगाव तालुक्यातील वीज वितरण सबंधित सोयी सुविधांसाठी १ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. यातून १० गावांच्या विविध समस्या मार्गी लागणार आहेत. अनेक वर्षांपासून मागणी असणारी कामे मार्गी लावल्याबद्दल सबंधित गावातील गावकरी व शेतकऱ्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने अनेक गावांना व वस्त्यांना पुरेश्या प्रमाणात वीज उपलब्ध होत नव्हती तसेच अनेक ठीक वीज होती मात्र त्यावरील भार वाढल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे अश्या समस्या निर्माण होत होत्या. तसेच विजेचे खांब जीर्ण झाल्याने ते धोकेदायक झाले होते. तर काही ठिकाणी महापुरात विजेचे खांब वाहून गेल्याने ते बदलणे आवश्यक होते. अशी अनेक वर्षांपासून मागणी असणारी कामे आता मार्गी लागली आहेत.
जिल्हा वार्षिक योजना (DPDC) मधून मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे…
१) हिंगोणे गावाला सद्यस्थितीत केवळ ८ तास वीजपुरवठा होतो, सदर गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार वाघळी गावठाण फिडर वरून हिंगोणे गावांना वीजपुरवठा काम मंजूर झाल्याने २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे – रु. १५.६३ लक्ष
२) तांबोळे बु. येथील अनेक विजेचे खांब जीर्ण झाल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. सदर ठिकाणी नवीन खांब टाकून सुधारित वीजप्रणाली निर्माण करणे – रु. ९ लक्ष
३) सायगाव व मांदुर्णे नदी तून जाणाऱ्या कृषी वीज वाहिनीची खांबे महापुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना वीजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, सदर ठिकाणी नवीन वीज वाहिनीचे काम करणे – रु. ८ लक्ष
४) बेलगंगा नगर (भोरस) येथे मोठ्या प्रमाणात वस्ती वाढल्याने वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर वर भार येत होता, सदर ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहे – रु. ९ लक्ष
५) चाळीसगाव शहराजवळील करगाव रोड रेल्वे बोगद्याजवळील टाकळी प्रचा अंतर्गत येणाऱ्या वस्ती मध्ये नवीन ११ केव्ही HT लाईन, रेल्वे लाईन क्रॉस करून जुना विमानतळ फिडर वरून ३ फेज वीज पुरवठा करणे – रु. २२.६४ लक्ष