सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली; आजचे भाव घ्या तपासून..

मार्च 9, 2023 11:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । होळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने घसरणीसह व्यवहार करत आहे. यामुळे आज सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला असून बहुतांश शहरातील सोन्या-चांदीच्या दरांमध्ये तफावत दिसून येत आहे. गेल्या महिन्यात सुरुवातीला 58 हजारांवर गेलेला सोन्याचा दर आता 55हजाराच्या खाली आला आहे. त्यामुळे ग्राहकांना उच्चांक दरापासून स्वस्त सोनं खरेदीची संधी आहे. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11 वाजेपर्यंत सोने 71 रुपयांनी घसरले आहे. या घसरणीसह सोन्याचा भाव 54,840 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दरम्यान, 1 मार्च 2023 पासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत जवळपास 1000 हजार रुपयाची घसरण झाली आहे. 1 मार्चला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 55,750 रुपयापर्यंत होता.

चांदीचे भाव
त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव आता 62 हजार रुपये प्रति किलोच्या जवळ आला आहे. चांदीच्या किमतीही चढ्या भावावरून खाली आल्या आहेत. आज चांदीच्या किमतीत 125 रुपयाची घसरण झाली असून यामुळे चांदीचा एक किलोचा दर 61,692 रुपयांवर व्यवहार करत आहे.यापूर्वी 1 मार्च 2023 रोजी चांदीचा एक किलोचा दर 64,100 रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत जवळपास 2400 रुपयांहून अधिक घसरण झालीय.

जळगाव सुवर्ण नगरीतील दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 50,900 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 55,500 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदी अंदाजित 64000 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान गेल्या महिन्यातील 2 फेब्रुवारीला जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 58,300 विना जीएसटीसह (GST सह जवळपास 59000) विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र त्यात आतापर्यंत मोठी घसरण दिसून येतेय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now