गुडन्यूज ! ऐन लग्नसराईत सोने-चांदी झाली पुन्हा स्वस्त; आजचे नवीन दर त्वरित तपासा

फेब्रुवारी 28, 2023 11:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२३ । तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याचा (Gold Rate) भाव रु.55000 रुपयाच्या आसपास आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या (Silver Rate) किमतीत घसरण झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सकाळच्या सत्रात सोने 0.19 टक्क्यांनी घसरले आहे. तर चांदी 0.26 टक्क्यांनी घसरले. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय झाला ते पाहूया.

gold silver jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर?

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने 106 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने 55,370 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदी 164 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे चांदीचा 62,800 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून येतेय. काल सोमवारी चांदीच्या भावात जवळपास 800 रुपायची घसरण दिसून आली.

सोने 3500 रुपयांनी स्वस्त झाले
दरम्यान, सोने विक्रमी उच्चांकावरून जवळपास 3500 रुपयांनी घसरले आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याची किंमत विक्रमी उच्चांकावर होती. या दिवशी सोन्याचा भाव 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात 3500 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्ण नगरीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,700 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदी 64000 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, जळगाव सराफ बाजारात दोन दिवसात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येतेय. शनिवारी चांदीचा एक किलोचा दर 66000 रुपये इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now