सोने उच्चांकी दरापेक्षा 2380 ने स्वस्त ; खरेदीपूर्वी आजचा 10 ग्रॅमचा दर तपासून घ्या..

फेब्रुवारी 15, 2023 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२३ ।  मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू आहे. परिणामी भारतीय बाजारपेठेतही सोन्या-चांदीचे दर कमी जास्त होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याबाबत ग्राहकांच्या मनात संभ्रम आहे. दरम्यान, जर तुम्ही या आज दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Gold Silver Rate Today

gold jpg webp

आज बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सोबतच चांदीची घसरली आहे. आज सोन्याचा भाव 57,000 रुपयांच्या खाली घसरला आहे. याचा अर्थ आज तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील.

सोने-चांदी किती स्वस्त झाले?
आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 254 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने 56,496 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोबतच चांदी 330 रुपायांनी घसरली असून 65,920 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

सोन्याचे दर लवकरच कमी होईल, अशी आस अनेकजन लावून बसले आहेत. लग्न सराईमध्ये दागिन्यांची मागणी वाढत असते. अशातच तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोन्याचे दर 60 हजार रुपयाचा टप्पा गाठू शकतो. दरम्यान, सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 2380 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दुसरीकडे, चांदी 9100 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली व्यवहार करत आहे. एप्रिल 2011 मध्ये चांदीने 75,000 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now