आजचा सोने चांदीचा भाव : ११ मे २०२१

मे 11, 2021 9:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात काल मंगळवारी चांदीच्या भावात तब्बल ५ हजार रुपयाने घट झाली होती. तर सोन्याचा भाव स्थिर होता. दरम्यान, आज सोने आणि चांदीचा भाव स्थिर आहे. आज कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाहीय.

gold

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव  ४,८०२ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,०२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,७३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज (११ मे) १ ग्राम चांदीचा भाव आज ७१. ०५ रुपये इतका असून १ किलोचा दर ७१,५०० रुपये इतका आहे.

दरम्यान, हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. यावेळी हा उत्सव 14 मे रोजी आहे. तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now