जळगाव लाईव्ह न्यूज | २१ जानेवारी २०२३ | बनावट नोटांना पायबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेत ५०० व १००० हजार रुपयांच्या नोटा तडकाफडकी बंद केल्या होत्या. त्यानंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांसह २००० रुपयांची नोटही चलनात आली. मात्र या ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटांनी सर्वसामान्यांची फसवणूक होण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत. बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत येवून पोहचले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील दोन जणांना २० हजारांच्या बनावट नोटांसह पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी असा रचला सापळा
साकेगाव येथून बनावट नोटा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरिक्षक विलास शेंडे यांनी खात्री करण्यासाठी एका ग्राहकाला संबंधित महिला संशयितेकडे पाठविले. या ग्राहकाला तीन हजार रुपयांच्या बदल्यात १५ हजार रुपयांच्या नोटा त्या महिलेने दिल्या. या नोटांवरील नंबर बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी संबंधित महिलेसह तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले. शहनाज अमीन (साकेगाव ता. भुसावळ) व हनीफ शरीफ देशमुख (लाखोली, जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
बनावट नोटांचे प्रमाण वाढले
सध्या देशात बनावट नोटांचे प्रमाण खूप वाढले आहे. भारतात पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधून अशा बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर येतात. आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी तयार केलेल्या बनावट नोटा ओळखणं कठीण आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २०२०-२०२१ या वर्षात ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १०२% वाढ झाली आहे. तर २००० रुपयांच्या नोटांमध्ये ५४ टक्के आणि १० रुपयांची नोटेमध्ये १६.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर २० रुपयांच्या नोटेमध्ये १६.५ टक्के आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये ११.७% वाढ झाली आहे.
बनावट नोटा कशा ओळखायच्या यासाठी आरबीआयच्या साईटवर १७ पॉईंट दिले आहेत, त्याची माहिती खालील प्रमाणे.
- नोटेवर पुढच्या बाजूला प्रकाश आरपार जाऊ शकेल असा छोटा भाग आहे. ज्या मूल्याची नोट आहे ते मूल्य आकड्यात लिहिल्यावर तयार होणार्या आकाराचा हा पारदर्शी भाग आहे. उदा. ५००च्या नोटेमध्ये ५००च्या आकड्याच्या आकाराचा आणि २००० च्या नोटेमध्ये आकड्यांमध्ये २००० च्या आकाराचा आहे. नोटेवर कुठलाही प्रकाश पाडून तुम्ही हे पडताळून पाहू शकाल.
- डोळ्यासमोर ४५ अंशांच्या कोनात नोट धरलीत तर त्यावर तुम्हाला त्या नोटेचं मूल्य दिसतं. हे वैशिष्ट्य नोटेच्या पुढच्या बाजूवर आहे.
- या ठिकाणी देवनागरीत ५०० लिहिलेले दिसेल.
- महात्मा गांधींचे चित्र अगदी मध्यभागी दाखवले आहे.
- भारत आणि खपवळरची अक्षरे लिहिलेली दिसतील.
- जर तुम्ही नोट हलके वाकवली तर सिक्युरिटी थ्रेडच्या रंगाचा रंग हिरव्यापासून इंडिगोमध्ये बदलताना दिसेल.
- जुन्या नोटेच्या तुलनेत गव्हर्नरची स्वाक्षरी, हमी कलम, वचन खंड आणि ठइख लोगो उजव्या बाजूला सरकले आहेत.
- येथे महात्मा गांधींचे चित्र आहे आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क देखील दिसेल.
- नोटेच्या उजवीकडे तळाशी नोटेचा विशिष्ट क्रमांक छापलेला आहे आणि यातील आकड्यांचा आकार वाढत जाणारा आहे.
- नोटेच्या उजव्या बाजूला तळाशी नोटेचं लिहिलेलं मूल्य लिहिलेलं आहे. त्याचा रंग बदलणारा आहे. नोट हलवलीत तर तो हिरवा आणि निळा अशा दोन वेगळ्या रंगात दिसतो.
- उजवीकडे अशोक स्तंभ आहे.
- उजव्या बाजूला ५०० किंवा २००० लिहिलेले वर्तुळ बॉक्स, उजव्या आणि डाव्या बाजूला ५ ब्लीड रेषा आणि अशोक स्तंभाचे प्रतीक, रफल प्रिंटमध्ये महात्मा गांधींचे चित्र.
- नोट छापण्याचे वर्ष लिहिलेले असते.
- स्वच्छ भारतचा लोगो घोषवाक्यासह छापलेला आहे.
- मध्यभागी एक भाषा फलक आहे.
- भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे.
- देवनागरीमध्ये नोटेचं मुल्य प्रिंट केलेले आहेत.