जिल्हा दूध संघ निवडणूक : कोणाला किती मते मिळाली? पहा संपूर्ण यादी

डिसेंबर 11, 2022 12:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगलेच तापले गेलं होते. यावरून आरोप-प्रत्यारोप होत होती. या निवडणुकीचे मतदान काल शनिवारी पार पडल्या यानंतर आज रविवारी सकाळी निकाल जाहीर झाला. यामध्ये शेतकरी पॅनलने १६ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर दुसरीकडे खडसे यांच्या सहकारी पॅनलला मोठा धक्का बसला आहे. सहकार पॅनलचे अवघे ४ जागा विजयी झाल्या आहेत. Jalgaon Dudh Sangh Election

jilha dudh sangh 1 jpg webp

जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. या निवडणुकीचा आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर काही तासातच निकाल हाती आला.

या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत जिल्हातील सर्वात लक्षवेधी लढतीत मुक्ताईनगर मतदार संघातून दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी 255 मते मिळवीत विजय मिळविला आहे.

कोणाला किती मते मिळाली?

मुक्ताईनगर मतदार संघ: आ. मंगेश चव्हाण (एकूण मते 255), मंदाकिनी खडसे (एकूण मते 179)
जामनेर मतदार संघ: मंत्री गिरीश महाजन (एकूण मते 276), दिनेश पाटील (एकूण मते 158)
पारोळा मतदार संघ : आ.चिमणराव पाटील (एकूण मते 227), सतीश अप्पा (एकूण मते 208)
रावेर मतदार संघ : जगदीश बढे (एकूण मते 170) ठकसेन पाटील (एकूण मते 266)
जळगाव मतदार संघ : मालती महाजन (एकूण मते 162), गुलाबराव पाटील ( एकूण मते 275)
एरंडोल मतदार संघ : दगडू चौधरी (एकूण मते 230), अमर जैन ( 205)
भडगाव मतदार संघ : रावसाहेब भोसले (एकूण मते 233), डॉ. संजीव पाटील (एकूण मते 200)
भुसावळ मतदार संघ : शामल झांबरे (एकूण मते 263), शालिनी ढाके (एकूण मते 169)
बोदवड मतदार संघ : ऍड. रवींद्रभैया पाटील ( एकूण मते 216), मधुकर राणे (एकूण मते 220)
चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील ( एकूण मते 247), सुभाष पाटील (एकूण मते 188)
चोपडा मतदार संघ : इंदिराबाई पाटील (एकूण मते 164), रोहित निकम (एकूण मते 269)
धरणगाव मतदार संघ : वाल्मिक पाटील (एकूण मते 167), संजय पवार (एकूण मते 269)
अमळनेर मतदार संघ : आ. अनिल पाटील(एकूण मते 246), स्मिता वाघ (एकूण मते 184)
यावल मतदार संघ : हेमराज चौधरी (एकूण मते 168), नितीन चौधरी (एकूण मते 260)

महिला राखीव मतदार संघ: छाया देवकर (एकूण मते 235) पूनम पाटील (एकूण मते -), सुनीता पाटील (एकूण मते 192), उषा पा.(एकूण मते-), मनीषा सूर्यवंशी (एकूण मते -164)

अनु जाती जमाती : ब्रम्हे श्रावण (एकूण मते 161), आ. संजय सावकारे (276)

वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (एकूण मते 179), अरविंद देशमुख (एकूण मते 259)

इ.मा.व : गोपाळ भंगाळे (एकूण मते 207), पराग मोरे (एकूण मते 230)



चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now