जळगावात तरुणीचा मोबाईल धूमस्टाईलने लांबविला

नोव्हेंबर 16, 2022 6:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । शहारतील ओरीयन इंग्लिश मिडीयम स्कूलजवळून एका तरुणीच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon crime 1 3 jpg webp

सविस्तर असे की, मंगळवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास मूळजी जेठा महाविद्यालयातील लेक्चर संपवून पायी अक्षदा मुकेश कुलकर्णी (रा. एसएमआयटी कॉलेजजवळ) ही विद्यार्थिनी घरी निघाली होती. ओरिअन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ स्कार्फ बांधण्यासाठी अक्षदा ही थांबली. याच दरम्यान, मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तिच्या खिशातील मोबाईल हिसकावला. अक्षदाने आरडा-ओरड केली. परंतू तो पर्यंत चोरटे मोबाईल घेऊन पसार झाले होते.

घरी आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now