जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । खासदार राहूल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी ते काश्मीर व आता महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात ‘भारत जोडो’ यात्रा रॅली चालू आहे. या अनुषंगाने यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी ‘भारत जोडो’ निमित्त तालुक्यात विविध गावात ठिकठिकाणी चित्ररथाचे जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीचे अति उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
डोंगर कठोरा येथे भारत जोडो पदयात्रा चित्ररथाचे युवकांनी व ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सद्या देशभरात निघालेल्या यात्रेस देशातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या भारत जोडो पदयात्रेचे टीव्ही स्क्रीनवर यात्रेचा हेतू व उद्देश्य याबाबत तसेच गांधी घराण्याचे भारत राजकारणा मधील योगदान व भूमिका या विषयी जमलेल्या नागरिकांना माहिती देण्यात आली. तसेच १८ नोव्हेंबर २२ रोजी भारत जोडो यात्रेनिमित्ताने यात्रेत सहभागी होण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.
यावल पंचायत समिती माजी गट नेते शेखर सोपान पाटील, कांग्रेस कमेटी चे माजी जिल्हा अध्यक्ष संदिप भैय्या पाटील, काँग्रेस कमेटीचे राज्य कार्यकारणी सदस्य उमेश जावळे, पवन राणे, अमर डॉ राजेंद्रकुमार झांबरे, भोजराज पाटील, लीलाधर जंगले, डोंगर कठोरा ग्रामपंचायत चे उपसरपंच धनराज पाटील, सामाजीक कार्य करें डिगंबर खडसे, मयूर जंगले, चंद्रकांत भिरुड, राहुल आढावे, भास्कर पाटील, किशोर कोल्हे, गबा पाटील यांच्यासह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.