जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे यांची पुढील चार दिवसात बदली होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हि माहिती पत्रकारांना दिली. धरणगावातील एका खाजगी कार्यक्रमात पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

अधिक माहिती अशी कि, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डीजी पाटील यांच्याकडील एका कौटुंबिक समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांसोबत गप्पा मारताना शहरातील काही विषय निघाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र माळी यांनी तहसीलदार हे वारंवार माळी समाजातील लोकांना टार्गेट करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी पत्रकार कल्पेश महाजन यांना दिलेल्या नोटिसी बद्दल देखील रामचंद्र माळी यांनी नाराजी व्यक्त केली.
या दोन्ही घटनांबाबत पालकमंत्री ना. पाटील यांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या नेहमीच्या निष्कील मिश्किल शैलीत पुढील चार दिवसात तहसीलदारांची बदली होणार असल्याची सांगून टाकले. तसेच सपकाळे नामक नवीन तहसीलदार येणार असल्याचेही माहिती दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी काही वेळ उपस्थित पत्रकारांसह सोबत थोडा वेळ हास्यगप्पा देखील मारल्या. यावेळी अभिजीत पाटील, पप्पू भावे, बुट्या पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.