जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र दिवाळीत पावसाने दांडी मारली आहे. आज पासून आठवडाभर आकाश निरभ्र राहणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र महिन्याच्या शेवटी पुन्हा आकाशात अवकाळीचे ढग येऊ शकतात असे म्हटले जात आहे. याचबरोबर थंडी देखील वाढली असल्यामुळे थंडीची तीव्रता आता हळूहळू वाढेल असेही म्हटले जात आहे.
पर्यायी नोव्हेंबर महिन्यापासून कडाक्याटी थंडी सुरू होईल असे म्हटले जात आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे ऐन दिवाळीतही पाऊस पाठ सोडणार नसल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, गेल्या दोन दिवसात ढगाळ वातावरण निवळून किमान तापमान घट झाली आहे. रविवारी वाऱ्याच्या वेग ताशी 7 ते 16 किलोमीटर होता. तर दुसरीकडे सकाळी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असून फारसा उकाडा जाणवला नाही.
हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाजानुसार 30 ऑक्टोबर पर्यंत वातावरण स्वच्छ आणि आकाश निरभ्र असेल. त्यानंतर दोन दिवस मात्र वातावरण ढगाळ होईल व येत्या काळात अवकाळी पावसाने शक्यता आहे. यामुळे ज्वारी बाजरी व इतर पिकांची नुकसान होण्याचा देखील धोका म्हटला जात आहे.